Breaking News

उरणमध्ये ई-श्रम कार्डवाटप, वृक्षारोपण कार्यक्रम

उरण : वार्ताहर, बातमीदार

वाढदिवस काहीतरी समाजहितासाठी साजरा व्हावा या उद्देशाने उरणमधील श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यता संस्थेच्या अध्यक्षा रायगड भूषण संगीता ढेरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि.3) उरण शहरात ई-श्रम कार्डवाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम घेतला. कोटगाव काळाधोंडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील मोकळ्या जागेत व व्यायाम शाळेच्या आजुबाजुला शोभेची झाडे व फुलझाडे लावून वृक्षारोपणाचा कार्यक्रम तसेच याच ठिकाणी ई-श्रम कार्डवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वृक्षारोपण व ई-श्रम कार्डवाटप या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केअर ऑफ नेचरचे अध्यक्ष रायगडभूषण राजु मुंबईकर, सामाजिक कार्यकर्ते अनिल घरत, कोटगावचे अध्यक्ष योगेश गोवारी, काळाधोंडा जिल्हा परिषद शाळेचे चेअरमन नवनीत भोईर, ज्येष्ठ नागरिक शंकर भोईर, कोटगावचे पंच कमिटी सदस्य जितेंद्र भोईर, व इतर कोटगाव ग्रामस्थ, श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था उरणच्या अध्यक्षा संगीता ढेरे, उपाध्यक्षा पुजा प्रसादे, वैदेही वैवडे, कविता म्हात्रे, सुप्रिया सरफरे, अभया म्हात्रे,  सारीका भोईर, महिमा म्हात्रे, अष्टभुजा हिरकणी व पत्रकार तृप्ती भोईर, साहिल प्रसादे, शाम भाऊ भोईर आदी उपस्थित होते. मान्यवरांना एक एक रोप देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला. केअर ऑफ नेचरचे अध्यक्ष राजू मुंबईकर यांनी श्री समर्थ  कृपा सखी स्वयंसहाय्यता संस्था उरण या संस्थेसाठी ई-श्रम कार्ड मोफत उपलब्ध करून दिले. तसेच त्यांनी व अनिल घरत यांनी संगीता ढेरे यांच्या हातून वेळोवेळी होणार्‍या समाजकार्यातील योगदानाचा इथे विशेष उल्लेख केला. जमलेल्या प्रत्येक मान्यवरांच्या हस्ते शोभेची व फुलझाडे लावण्यात आली तसेच या लावलेल्या झाडांना पाणी घालण्यात आले.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply