Breaking News

उरण येथे बाल संस्कार, शिशु संस्कार वर्ग

उरण : वार्ताहर

उरण शहरातील आनंद नगर येथे श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बाल संस्कार समाज मंदिर दिंडोरी यांच्या वतीने दर शनिवारी सायंकाळी सहा ते सात या वेळेत मोफत बाल संस्कार व शिशु संस्कार वर्ग घेतले जात आहेत. गेले सहा वर्षापासून हे कार्य सुरु आहे. उरण शहरातील 15 वर्षा पर्यंतच्या वयोगटातील मुलांनी याचा लाभ घेतला आहे. या संस्कार वर्गात मुलांना प्रार्थना, स्तोत्र मंत्र, पारंपरिक खेळ, महापुरुषांची माहिती, व्यायाम, सूर्य नमस्कार, संस्कार अशा विविध प्रकारची माहिती दिली जाते. मुलांच्या अंगी कोणते गुण असावेत, मुलांच्या कलागुणांना विकास कसा होईल या कडे लक्ष दिले जाते. कार्यक्रम झाल्यानतर मुलांना खाऊ वाटप करण्यात येते. या संस्कार शिबिरात प्रतिनिधी सुरेखा सुनील फेगडे, साक्षी सुहास गवस, स्वाती घरत, अनिता परमार, दीपिका म्हात्रे आदी मेहनत घेत असल्याचे सांगण्यात आले.

Check Also

राम तेरी गंगा मैली @४१ वर्षे; राज कपूरच्या दिग्दर्शनातील शेवटचा चित्रपट

चित्रपटाच्या नावात त्याचं व्यक्तिमत्त्व अथवा ओळख व्हायला हवी. त्यातही दिग्दर्शक दिसतो. राज कपूरच्या दिग्दर्शनातील चित्रपटाचे …

Leave a Reply