Breaking News

महाड भाजप महिला मोर्चातर्फे मातृदिनानिमित्त पोषण आहार वाटप

महाड : प्रतिनिधी

जागतिक मातृदिनाचे औचित्य साधुन रविवारी (दि. 8) महाड भाजप महिला मोर्चाच्या वतीने आदिवाडीवरील मातांना पोषण आहार वाटप करण्यात आला. या वेळी जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर सह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

आदिवाड्यावरील माता आणि बालकांना आजही पोषण आणि संतुलीत आहार मिळत नाही. आदिवासींच्या वाट्याचे अन्न धान्य मोठ्याप्रमाणात काळ्या बाजारात विकले जाते. त्यामुळे तालुक्यातील दुर्गम आदिवासीवाड्यांवरील बालके आजही कुपोषित आहेत, मात्र या गोष्टी रेकॉर्डवर येत नसल्याकारणाने, कुपोषणाची दाहकता दिसण्यात येत नाही.

दरम्यान, महाड भाजपच्या वतीने मातृदिनाच्या दिनी जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर आणि जिल्हा उपाध्यक्षा निलीमा राजेय भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोळोसे आदिवासी वाडीवर आदिवासी मातांना पोषण आहारचे वाटप करण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष रश्मी वाझे, प्राजक्ता दळवी, कल्पना विचारे, सुलभा पालांडे, सई शिंदे, मेघा ठाकुर, प्रिया खोडके, सोनाली घोलप, वासंती धाडवे, नेहा वाघ, कोमल शेठ, ऋशाली विश्वेश साठे या महिला पदाधिकार्‍यांसह शहर अध्यक्ष निलेश तळवटकर, वाहतूक सेलचे अध्यक्ष नाना पोरे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदिप ठोंबरे, तालुका उपाध्यक्ष चंद्रजित पालांडे आदी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply