Breaking News

नेरळमध्ये एकाच रात्रीत तीन ठिकाणी घरफोडी

कर्जत : बातमीदार

नेरळ साई मंदिर परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास  डॉ. कुणाल राठोड यांचा दवाखाना आणि मेडिकल स्टोअर्स  तसेच युवराज बिल्डिंगमधील संतोष धुळे यांचे किराणा दुकान फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यात चोरट्यांच्या हाती काहीही लागले नसले तरी त्यांनी तेथील वस्तूंचे नुकसान केले आहे.

नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेरळ साई मंदिर येथे शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी डॉ. राठोड यांचे ओजस क्लिनिक आणि मेडिकल स्टोअर फोडले. यातील काहीही चोरट्याने चोरून नेले नसले तरी शटर व डॉक्टरांच्या केबिनचे नुकसान केले आहे. तर युवराज बिल्डिंगमधील संतोष धुळे यांचे किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. यातही त्यांनी दुकानांच्या शटरचे नुकसान केले आहे. यातील चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असले तरी त्यांच्या तोंडाला फडके बांधले असल्याने ते ओखून येत नाहीत. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून, पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी दुकानदार संतोष धुळे आणि डॉ. कुणाल राठोड यांनी केली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply