जिवीतहानी नाही, मात्र मोठे नुकसान
पनवेल : वार्ताहर
शहरातील एका आंब्याच्या दुकानाला अचानकपणे लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या जवळील जय भारत नाक्यावरील एका आंब्याच्या दुकानाला सोमवारी (दि. 9) रात्री आग लागली. या आगीची माहिती मिळताच पनवेल महानगर पालिकेच्या अग्निशमक दलाची गाडी घटनास्थळी आली व जवानांनी ही आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही व कोणतीही जीवितहानी झालेली नसून दुकानातील आंब्याचे नुकसान झाले आहे.