टोकियो पॅरालिम्पिक
टोकियो ः वृत्तसंस्था
भारताच्या भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास 4 स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे. भाविनाने या स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक आणले आहे. अंतिम फेरीत भाविनाचा जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगने 3-0 असा पराभव केला.
टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी 34 वर्षीय भाविना भारताची पहिली खेळाडू ठरली आहे. पराभव होऊनही भाविनाने आपल्या खेळाने मने जिंकली. भाविनाने उपांत्य फेरीत चीनच्या मियाओ झांगचा 3-2 असा पराभव केला होता. तिने भारतीय शिबिरातील सर्वांना चकित करून जागतिक क्रमवारीत तिसर्या क्रमांकावर असलेल्या 7-11, 11-7, 11-4, 9-11, 11-8 ने पराभूत केले होते.
गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात लहान किराणा दुकान चालवणार्या हसमुखभाई पटेल यांची मुलगी असलेली भाविना सुवर्ण पदकाची दावेदार मानली जात होती, पण अंतिम फेरीत जागतिक
क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूनकडून पराभव झाल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भाविनाच्या या उत्कृष्ट कामगिरीने कामगिरीने इतिहास रचला आहे.
2017मध्ये आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाची तिसर्या क्रमांकाची लढत रद्द करण्याची विनंती आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने मान्य केली. त्यामुळे उपांत्य लढतीमधील दोन्ही पराभूत स्पर्धकांना कांस्यपदक दिले जाऊ लागले.