महाड ः प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाची साफसफाई करण्याचे काम दुर्गरक्षक संस्थेचे शिवभक्त गेल्या काही दिवसांपासून करीत आहेत. त्यांनी केलेल्या स्वच्छता मोहिमेत पंधराशे पोती कचरा गडाखाली जमा करून आणला. दुर्दैवाने या कचर्यात सुमारे 450 ते 500 दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे पवित्र सिंहासन त्याच बरोबर नतमस्तक व्हावे असे समाधीस्थळ असल्याने किल्ले रायगड तमाम भारतीयांचे तीर्थक्षेत्र आहे. गेल्या काही वर्षांपासून किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक आणि पर्यटक येत असतात, मात्र काही पर्यटक व हौशे नवशे रायगड किल्ला म्हणजे मौजमजा करण्याचे ठिकाण
असल्याचे समजतात. किल्ले रायगडवरील साफसफाई करण्याचे काम दुर्गरक्षकचे शिवभक्त करीत आहेत. गडाच्या कानाकोपर्यातील प्लास्टिक, कचरा साफ करीत असताना या शिवभक्तांना झाडाझुडपांमध्ये लपवून ठेवलेल्या शेकडो दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या. वास्तविक. गडावर दारूबंदी आहे, तसेच येणार्या पर्यटकांवर बारीक नजर असते. त्यातूनही काही टवाळ मंडळी गडावर दारूच्या पार्ट्या करीत असल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत थांबला पाहिजे गडावर रक्षक म्हणून काम करणार्या कर्मचार्यांनी तसेच पुरातत्व खात्याच्या अधिकार्यांनी गांभीर्याने याची दखल घेतली पाहिजे, अशी मागणी शिवप्रेमींकडून होत आहे.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …