Breaking News

शिक्षक दिनानिमित्त आभासी प्रशिक्षण   

पनवेल ः रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित पुणेतर्फे सर्व शिक्षकांकरिता शिक्षणदिनी शनिवारी (दि. 5) आभासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. फेसबुक सेशन सकाळी 11 वाजता सुरू होईल. हे सेशन विनामूल्य आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित कोकण विभागाचे समन्वयक जयंत भगत यांनी केले आहे.
 डिजिटल युगात दैनंदिन जीवनाप्रमाणेच शिक्षण क्षेत्रातही विविध ऑनलाइन टूल्सचा वापर वाढत आहे. शिक्षण क्षेत्रातही कोविडमुळे अनुभवास आलेली व भविष्यातही डोके वर काढू शकेल अशी टाळेबंदीची अनिश्चितता लक्षात घेता विविध ऑनलाइन टूल्सचा वापर करणे क्रमप्राप्त आहे. या बदलांमुळे शिक्षकांना आकर्षक प्रेझेंटेशन बनवणे, व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे, ऑनलाइन टूल्स वापरून प्रश्नमंजुषा तयार करणे, गुगल मिट व वेबिनारसारख्या अनेक डिजिटल स्किल्सची गरज भासते. विद्यार्थ्यांनाही याचा वापर करून ऑनलाइन शिक्षण घेणे गरजेचे आहे. म्हणूनच नवीन शैक्षणिक प्रणाली आत्मसात
करून व डिजिटल स्किल्स वापरून शिक्षणास सहजरीत्या अधिक माहितीपूर्ण व आनंददायी कसे बनवता येईल, असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल)तर्फे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांसाठी एक ऑनलाइन फेसबुक सेशन आयोजित करण्यात येत आहे.  
www.mkcl.org/live या फेसबुक सेशनमध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त एंगेजिंग कंटेंट जसे प्रेझेंटेशन, व्हिडीओच्या माध्यमातून स्मार्ट टीचिंग टेक्निक्स वापरून प्रभावीपणे कसे शिकवता येईल याबद्दल एमकेसीएलच्या प्रतिनिधींकडून माहिती दिली जाईल.

Check Also

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …

Leave a Reply