Breaking News

पनवेलमध्ये दुकानाला आग

नगरसेवक राजू सोनी यांची तत्परतेने मदत

पनवेल : वार्ताहर

पनवेल शहरातील ममता कॉस्मेटिक्स दुकानाला लागलेल्या आगीच्या वेळी नगरसेवक राजू सोनी यांनी धाव घेतली. त्यांनी तत्परतेने हि आग विझवण्यासाठी मदत केली.

पनवेलमधील जुने भाजी मार्केट येथे नारायण शर्मा यांच्या मालकीचे असलेले ममता कॉस्मेटिक्स यांच्या दुकानाला आग लागली याची माहिती येथील काही व्यापार्‍यांनी नगरसेवक राजु सोनी यांना फोन करून दिली. या वेळी ते तत्काळ तेथे पोहचले व लगेच अग्निशामक दलाला फोन करून ताबडतोब बोलवले. त्या ठिकाणी संपुर्ण महानगरपालिकेची यंत्रणा लावुन सोनी यांच्या उपस्थितीतच संपूर्ण आग विझवण्यात आली. त्यामुळे येथील व्यापार्‍यांनी त्यांचे खुप आभार मानले आहेत.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply