विविध योजनांचा आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शुभारंभ
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत देशात हर घर नल, हर घर जल हे अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत तालुक्यातील केळवणे येथे 79 लाख 33 हजार रुपयांची नळपाणी योजना व केळवणेतील आठ लाख 88 हजारांच्या अंतर्गत गटार बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ उद्या रविवारी (दि. 15) होणार आहे.
या कामांचा शुभारंभ भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व उरण विधानसभा मतदासंघाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत व भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या योजनेंतर्गत केळवणे गावात प्रत्येक घरात पाणी मिळणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आभार मानले आहेत.