Breaking News

सेवा सप्ताहानिमित्त ठिकठिकाणी उपक्रम

भाजपकडून महिलांना कंदील बनवण्याचे प्रशिक्षण

पनवेल : रामप्रहर वृत्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आत्मनिर्भर भारत संकल्प मोहीम प्रमुख तथा भाजप खारघर तळोजा महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील आणि सहप्रमुख तथा खारघर तळोजा महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार यांच्या सहकार्याने राबविण्यात आली.

या वेळी महिलांना दिवाळी कंदील बनवण्याचे प्रशिक्षण साधना घन्टि यांनी दिले. तसेच संध्या शारबीद्रे यांनी प्रधानमंत्री योजनांची माहिती महिलांना दिली. या वेळी मोना अडवानी मीडिया जिल्हा संयोजक, प्रतीक्षा कदम उपाध्यक्ष, वैष्णवी शिंदे कोषाध्यक्ष, राजश्री नायडू सदस्य ह्या उपस्थित होत्या.

जाणीव एक सामाजिक संस्थेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम

पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त जाणीव एक सामाजिक संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष तथा भाजप शहर सरचिटणीस नगरसेवक नितीन पाटील, शहर सोशल मीडिया संयोजक प्रसाद हनुमंते, महेश सरदेसाई, प्रसाद कंधारे, केतन खुटले, विशाल कामटेकर, शंकर चव्हाण व पुनीत पाटील आदी उपस्थित होते.

खारघरमध्ये प्लास्टिकमुक्ती संकल्प अभियान

खारघर : रामप्रहर वृत्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवासप्ताह अंतर्गत, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खारघरमध्ये सिंगल यूज प्लास्टिक मुक्ती संकल्प अभियान राबविण्यात येत आहे.

कार्यक्रमाचे जिल्हा सह-प्रमुख गीता चौधरी, खारघर तळोजा मंडळ प्रमुख संजय घरत, सह-प्रमुख बिना गोगरी यांच्या सहकार्‍याने व नगरसेविका हर्षदा अमर उपाध्याय यांच्या पुढाकाराने व कार्यक्रमाच्या संयोजिका खारघर तळोजा मंडळ महिला मोर्चा चिटणीस मधुमिता जेना व सहसंयोजक श्यामला सुरेश यांनी गुरुवारी (दि. 17) खारघर सेक्टर 12 भाजी मार्केटमध्ये सिंगल यूज प्लास्टिक मुक्ती संकल्प अभियान उपक्रम राबविला. या मोहिमेंतर्गत प्लास्टिक बंदीचे महत्त्व पटवून देण्यात आले. कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. तसेच कापडी पिशवी घेऊन आलेल्या लोकांचे गुलाबाचे फूल देऊन कौतुक करण्यात आले. 

या वेळी नगरसेविका हर्षदा अमर उपाध्याय, उत्तर रायगड जिल्ला चिटणीस गीता चौधरी, भाजप खारघर तळोजा मंडळ शहर उपाध्यक्ष निशा सिंह, सीमा खडसे आदी उपस्थित होत्या.

खांदा कॉलनी येथे वृक्षारोपण

पनवेल : रामप्रहर वृत्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशच्या आदेशानुसार आणि उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली खांदा कॉलनी भाजपच्या वतीने सेक्टर 8 दुर्गामाता मंदिर व सेक्टर 5 येथे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास पनवेल शहर मंडल अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक एकनाथ गायकवाड, संजय भोपी, नगरसेविका सीता पाटील, तसेच प्रकाश खानावकर, शशिकांत शेळके, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, रामनाथ पाटील, जितेंद्र माने, गोपीनाथ मुंडे, संजय कांबळे, सचिन गायकवाड, सुनील हरनामे, प्रवीण भोसले, नवनाथ मेंगडे, सचिन सातपुते, विजयकुमार जाधव, मधू पगारे, संतोष पवार, सुनीता गुरव, आशा मुंडे, राखी पिंपळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते

उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply