Breaking News

सीकेटी स्वायत्त महाविद्यालयाचा रौप्य महोत्सवी समारंभ

मंत्री चंद्रकांत पाटील, माजी कुलगुरू डॉ. विजय खोले यांची लाभणार प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
दर्जेदार शिक्षणासोबत कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रांत अग्रेसर असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयाला 25 वर्र्षे झाली आहेत. त्या अनुषंगाने या महाविद्यालयाचा दोन दिवसीय रौप्य महोत्सव समारंभ येत्या शनिवारी (दि. 11) राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व रविवारी (दि. 12) मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.
महाविद्यालय 25 वर्षे पूर्ण करून जी यशस्वी वाटचाल करीत आहे त्याचे श्रेय संस्थेचे पदाधिकारी, सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना जाते. रौप्य वर्ष महोत्सवानिमित्त 11 मार्च रोजी खांदा कॉलनी येथील महाविद्यालयात संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे, तर संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर सीताताई पाटील, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अनिल भगत, वर्षा ठाकूर, संजय भगत, राज अलोनी, प्रकाश भगत, हरिश्चंद्र पाटील, भरत ठाकूर, संजय पाटील, माजी नगरसेवक नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, भागुबाई चांगू ठाकूर विधी कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य धनश्री कदम, रामशेठ ठाकूर कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड त्याचबरोबर सीकेटी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, रौप्य महोत्सवी समारंभाचे समन्वयक डॉ. डी. एस. नारखेडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य यांचा सत्कार आणि महाविद्यालयातील विविध विभागांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
दुसर्‍या दिवशी म्हणजेच 12 मार्च रोजी होणार्‍या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर भूषविणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू व राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे माजी संचालक डॉ. एस. एन. पठाण यांना आमंत्रित केले गेले आहे. सोबतच संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे, माजी प्र. कुलगुरू डॉ. नरेश चंद्रा, रूसा प्रकल्पाचे माजी वरिष्ठ सल्लागार डॉ. विजय जोशी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर सीताताई पाटील, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अनिल भगत, वर्षा ठाकूर, संजय भगत, राज अलोनी, प्रकाश भगत, हरिश्चंद्र पाटील, भरत ठाकूर, संजय पाटील, माजी नगरसेवक नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, भागुबाई चांगू ठाकूर विधी कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य धनश्री कदम, रामशेठ ठाकूर कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड, सीकेटी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, कला शाखेचे प्रमुख डॉ. बी. एस. पाटील, वाणिज्य शाखेचे प्रमुख डॉ. एस. बी. यादव, विज्ञान शाखेच्या प्रमुख डॉ. जे. एस. ठाकूर आणि आयक्यूएसी विभागाचे समन्वयक डॉ. बी. डी. आघाव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महाविद्यालयातील जडणघडणीसाठी मोलाचा वाटा उचलणार्‍या प्रतिष्ठित व्यक्ती, विद्यापीठाचे अधिकारी, महाराष्ट्र राज्याचे अधिकारी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आजी व माजी विद्यार्थ्यांना या वेळी सन्मानित करण्यात येणार आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply