Breaking News

शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी मिरवणुका; मान्यवरांचे अभिवादन

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात मंगळवारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शहरी भागात मिरवणुका काढण्यात आल्या. अलिबाग शहरात मावळा प्रतिष्ठानसह, विविध सामाजिक व शिवप्रेमी संघटनांनी एकत्र येऊन शिवप्रतिमेची मिरवणूक काढली होती. यात मोठ्या प्रमाणावर तरुण सहभागी झाले होते.

अलिबाग शहरातील ब्राह्मण आळीमधील राममंदिर येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. सुरुवातीला पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांतर ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक निघाली. या वेळी दांडपट्टा, तलवारबाजी आदी खेळांच्या कसरती सादर करण्यात आल्या. तुळजाभवानी मातेची भव्य प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. राममंदिरपासून महावीर चौक, शेतकरी भवन, ठिकरूळ नाका, जामा मशीद मार्गे शहरातील जोगळेकर नाक्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या मिरवणुकीची सांगता झाली. अलिबाग नगर परिषद, संभाजी ब्रिगेड यांच्यासह काही सामाजिक संघटनांतर्फेही छत्रपती शिवाजीमहाराजांना अभिवादन करण्यात आले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना राजस्थानी समाजाचा जाहीर पाठिंबा

खारघर : रामप्रहर वृत्त खारघर राजस्थानी समाजच्या वतीने दिपावली स्नेह मिलन आणि विशाल भजन संध्या …

Leave a Reply