उरण : दिनेश पवार : दिवसेन दिवस वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढल्याने पोटाला थंडाचा मिळावा म्हणून प्रत्येक जण वेगवेगळे प्रकारे थंड व गारेगार कलिंगड खातात तर कुणी सरबत, लिंबू सरबत, कोल्ड्रिंग, बच्चे कंपनी बर्फाचा गोळा खातात, उसाचा रस पितात, तर काही नारळाचे पाणी पितात, शरीरातून घामाच्या धारा वाहु लागातच अश्या थंडगार पेय पिण्याचा मोह सर्वानाच होतो. त्यात नारळाचे पाणी हे उत्तम आहे.101 आजारावर नारळ पाण्याचे फायदे आहेत. पाण्यात औषधी गुणधर्म देखील आहेत .आयुर्वेदाच्या मते नारळाचेपाणी थंड असते. नारळ पाणी हे तहान भागविण्याचा गोड मार्ग होय. मात्र पाणी पूर्णता नैसर्गिक असून पाणी आरोग्याला खूप फायदेशीर आहे .सकाळी व्यायाम झाल्यानंतर नारळ पाणी फायदेशीर असते ,वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असते .पाणी पिल्याने भूक कमी होते . वजन नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे .रोज नारळ पाणी प्यायल्याने अनेक आजारावर इलाज करण्यास मदत होते .नारळाचे पाणी भरपूर प्यायल्याने कोलेस्ट्रोल वाढत नाही . उरण शहरात विमला तलाव ,उरण चारफाटा ,आनंद नगर ,जरीमरी मंदिर जवळ ,महात्मा गांधी पुतळ्या जवळ ,लाल मैदान आदी ठिकाणी नारळाचे शहाळे विकणारे दिसत आहेत ,आम्ही अलिबाग ,मुरुड ,पनवेल ,नागाव केगाव येथून शहाळे आणतो .शहाळे 35 ते 45 रुपये या दराने विकत असतो .दुपारच्या वेळेस खूप प्रमाणात शहाळे विकले जातात असे शहाळे विक्रेते सबिन यांनी सांगितले . कोल्ड्रिंग ,पिण्या पेक्षा नैसर्गिक पाणी केव्हाही चांगले केमीकाल उक्त सरबते पिणे आरोग्याला अपायकारक असतात .कोणत्याही प्रकारची भेसळ नसणारे नारळ पाणी पिणे फायदेशीर आहे .असे कामठा येथील भूषण घरत यांनी सांगितले
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …