पनवेल ः सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने चोरी करण्यांवर खांदेश्वर आणि कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पोलिसांनी त्रिकुटाला अटक केली आहे.
कामोठ्यातील राधिका ज्वेलर्समधून 38 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, तर खांदा कॉलनी सेक्टर 10 येथील ज्योतिर्लिंग ज्वेलर्समध्ये अशीच चोरी झाली होती. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी बदलापूर येथून संगीता सुदर्शन खीची (वय 49), सुनील प्रकाश साळुंखे (41) व विनोद प्रकाश साळुंखे (48 सर्व रा. बदलापूर, कात्रप) यांना अटक केली. त्यांच्याकडून कामोठे, खांदेश्वर आणि डोंगरी येथील गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.