पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ जोमा पाटील यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि. 6) सकाळी पनवेल येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या पार्थिवाला मुलगा सचिन पाटील यांनी मुखाग्नी दिला. लक्ष्मणशेठ यांच्या निधनाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह विविध पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, संस्था, संघटनांनी शोक व्यक्त केला आहे.
कै. लक्ष्मणशेठ यांच्या पश्चात पुत्र अविनाश, शैलेश व सचिन पाटील, मुलगी राजश्री दीपक म्हात्रे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ज्येष्ठ नेते लक्ष्मणशेठ पाटील हे प्रेमळ, मनमिळावू, मितभाषी आणि हसतमुख स्वभावाचे होते. ते आदराने दादा या नावाने सुपरिचित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांचे ते अत्यंत जवळचे सहकारी होते.
लक्ष्मणशेठ यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, बबन पाटील, आर. सी. घरत, राजेंद्र पाटील, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, शहर अध्यक्ष जयंत पगडे आदी उपस्थित होते.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper