Breaking News

आमदार महेश बालदी यांना रेखाचित्र भेट

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील सारडे गावचे रेखाचित्रकार कुणाल रामचंद्र पाटील यांनी कोरोना काळात आपला छंद जोपासला आहे. त्यांनी आमदार महेश बालदी यांचे रेखाचित्र (पेन्सिल स्केच) काढून गुरुवारी (दि. 22) उरण भाजप कार्यालयात त्यांची भेट घेऊन फ्रेम दिली.

या वेळी आमदार महेश बालदी यांनी रामचंद्र पाटील यांच्या कलेचे कौतुक करीत अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, उरण तालुका उपाध्यक्ष पंडीतशेठ घरत, माजी नगराध्यक्ष नितीन पाटील, युवा कार्यकर्ते प्रीतम म्हात्रे आदी उपस्थित होते.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply