नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिमपूजन गुरुवारी (दि. 19) करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून नाला बंदिस्त करून पादचारी मार्ग तयार करणे, रस्त्यालगत गटार व रस्त्याचे स्टॅम्प काँक्रिटीकरण करणे या कामांचे भूमिपूजन व रूचिता लोंढे यांच्या नगरसेवक निधीमधून प्रसन्न निवास सोसायटीलगत असलेल्या गल्लीत करण्यात आलेल्या स्टॅम्प काँक्रीटीकरण रस्त्याचे आणि वायफाय सेवेचे लोकार्पण भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.
पनवेल महापालिका क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक विकास कामे महापालिका क्षेत्रात करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत प्रभाग क्रमांक 19 मधील महात्मा फुले रस्त्यावरील माऊली दर्शन ते लोकमान्य टिळक रस्त्यावरील श्री रामदास मारुती मंदिर या रस्त्याला जोडणारा नाला बंदिस्त करणे या 20 लाख 95 हजार 622 रुपयांचे कामाचे व ताम्हणे बंगला ते शहा प्लाझापर्यंच्या रस्त्यालगतचे गटार व पूर्ण रस्त्याचे स्टॅम्प काँक्रीटीकरण या 20 लाख 19 हजार 424 रुपयांच्या कामाचे भूमिपूजन सोहळा आणि नगरसेविका रुचीता लोंढे यांच्या नगरसेवक निधीमधून करण्यात आलेल्या प्रसन्न निवास सोसायटी लगत असलेल्या गल्लीमध्ये स्टॅम्प काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचे लोकार्पण करण्यात आले.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, अनुभवी नगरसेवकांसोबत काम करत असताना वयाने तरुण असून सुद्धा सगळ्याच्या बरोबरीने माझे काम असले पाहिजे या भावनेने रुचीता लोंढे काम करत आहेत अशी कार्यशील नगरसेविका तुम्हाला मिळाली त्याबद्दल तुमचे अभिनंदन करतो असे सांगून रुचीता लोंढे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याला महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, स्थायी समिती सभापती अॅडव्होकेट नरेश ठाकूर, प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती अॅड. वृषाली वाघमारे, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, भाजप नेते नंदू पटवर्धन, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, राजू सोनी, अजय बहिरा, मुकीद काझी, नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर, रूचिता लोंढे, माजी नगरसेविका नीता माळी, भाजपचे युवामोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अभिषेक पटवर्धन, मोहन जोशी, गुरुनाथ लोंढे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक मोठ्या संक्येने उपस्थित होते. दरम्यान या वेळी नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या वायफाय सेवेचा उपस्थित मान्यवरांनी शुभारंभ केला असून, प्रभागामध्ये आणखी 10 ठिकाणी ही सेवा सुरु करण्यात येणारा असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.