Breaking News

अलिबाग विधानसभा मतदारसंघात चमत्कार घडणार : अनंत गीते

अलिबाग ः प्रतिनिधी

रायगडचे मतदार सुज्ञ आहेत. या सुज्ञ मतदारांनी माझ्या बाजूनेच कौल दिला आहे. या वेळी अलिबाग विधानसभा मतदारसंघात चमत्कार घडेल. या मतदारसंघातही मला आघाडी मिळेल. केवळ मलाच आघाडी मिळेल असे नाही, तर आलिबाग विधानसभा मतदारसंघाचा पुढील आमादारदेखील शिवसेनेचाच असेल, असा आत्मविश्वास रायगड लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री  अनंत गीते यांनी व्यक्त केला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी काम करणारे महायुतीमधील घटक पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदारांचे आभार मानण्यासाठी आयोजित आभार मेळाव्यात केंद्रीय मंत्री अनंत गीते बोलत होते.

क्षत्रेक्य माळी समाज सभागृह कुरूळ-अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर जैन, रायगड जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, माजी जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, विजय कवळे, प्रशांत मिसाळ, अलिबाग तालुकाप्रमुख राजा केणी, अलिबाग शहरप्रमुख संदीप पालकर, सतीश  पाटील, कामगार नेते दीपक रानवडे, अ‍ॅड. सुशील पाटील, भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस सतीश लेले, दर्शन प्रभू आदी उपस्थित होते.

 रायगड लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मला आघाडी मिळणार आहे. 23 मे रोजी मतमोजणीची केवळ औपचारिकता पूर्ण करून माझ्या विजयावर शिक्कामोर्तब होणार आहे. मी निवडून येणार आहेच, मात्र त्याबरोबरच या लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघांचे आमदारदेखील युतीचेच निवडून आणायचे आहेत. आतापासूनच आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करायची आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघातदेखील भगवाच फडकणार आहे, असे अनंत गीते यांनी ठामपणे सांगितले.

 महेंद्र दळवी, सुरेंद्र म्हात्रे, किशोर जैन, सतीश लेले यांचीदेखील या वेळी सामयोचित भाषणे झाली. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले आहे. स्वच्छ चारित्र्याचा नेता म्हणून मतदारांनी अनंत गीते यांनाच मतदान केले आहे. त्यामुळे अनंत गीते यांचा विजय निश्चित आहे, असा आत्मविश्वास या सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.

ना. रवींद्र चव्हाण, आ. प्रशांत ठाकूर यांना खास धन्यवाद
रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर या दोघांनी सुरुवातीपासूनच ठाम भूमिका घेतली. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. त्यामुळेच माझा विजय सोपा झाला आहे. त्यामुळे या दोघांना मी खास धन्यवाद देतो, असे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी आवर्जून सांगितले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply