Breaking News

अलिबाग-मांडवा मार्गावर मॅजिक गाडीला अपघात

एक ठार, चालकासह नऊ प्रवासी जखमी

अलिबाग : प्रतिनिधी

तालुक्यातील मांडवा बंदरावरून अलिबागकडे प्रवासी घेऊन येणार्‍या मॅजिक गाडीला शनिवारी (दि. 21)सकाळी अपघात झाला. या अपघातात एका 27 वर्षीय प्रवाशी तरुणीचा मृत्यू झाला तर आठ प्रवाशांसह चालक जखमी झाला आहे. त्याला अधिक उपचारासाठी पनवेल येथे हलविण्यात आले आहे. उर्वरित जखमी प्रवाशांवर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दर सुट्टीला मुंबईतून पर्यटक मोठ्या संख्येने अलिबागेत येत असतात. मुंबई-मांडवा जलवाहतूक सुविधेमुळे पर्यटकांना अलिबाग फारच सोयीचे आणि जवळचे झाले आहे. शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास प्रवासी घेऊन अलिबागकडे येणार्‍या मॅजिक गाडीला (एमएच-06, 6961) रहाटले गावच्या उतरणीवर भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याकडेला असलेल्या मोरीत कोसळली, अशी माहिती मिळते.

या अपघातात वर्षा कलपा कूट (वय 27, रा. डोंबिवली) या प्रवाशी तरुणीचा जबर दुखापतीमुळे मृत्यू झाला. तर मॅजिक गाडीचा चालक पेढवी (पूर्ण नाव समजू शकले नाही. रा. नांदाईपाडा, ता. अलिबाग), तसेच त्रिशाली रवींद्र मिरचकर, रवींद्र श्रीपाद मिरचकर, त्यांच्या मुली अक्षदा आणि आदिती, आदर्श जयस्वाल, सागर डेडिया, श्रुती वरदमान, अमृता कुलकर्णी (सर्व रा. डोंबिवली व बदलापूर) हे प्रवासी जखमी झाले.

या घटनेचे वृत्त समजताच अन्य रिक्षा चालकांनी घटनास्थळी धाव घेऊन, जखमी प्रवाशांना व चालकाला रुग्णालयात हलविले. अधिक उपचारासाठी त्यांना मुंबईत हलविण्यात आहे. अपघातात मॅजिक गाडीचेसुद्धा मोठे नुकसान झाले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply