Breaking News

कार्लेखिंडीत आंब्याचा ट्रक पलटी

अलिबाग : प्रतिनिधी

मुरूडहून मुंबईकडे आंब्याच्या पेट्या घेवून जात असलेला ट्रक शनिवारी (दि. 21) अलिबाग-पेण मार्गावरील कार्लेखिंडीत पलटी झाला. या अपघातात कोणी जखमी झाले नसले तरी ट्रकचे नुकसान झाले आहे. अपघातामुळे कार्लेखिंडीत वाहतुकीची कोंडी झाली होती.

शनिवारी सकाळी मुरूडहून आंब्यांच्या पेट्या भरलेला ट्रक मुंबईच्या दिशेने निघाला होता. अलिबाग-पेण मार्गावर कार्लेखिंडीत एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक पलटी झाला. या अपघातात चालक सुदैवाने बचावला मात्र ट्रकचे नुकसान झाले. या अपघातामुळे अलिबाग-पेण मार्गावर काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply