अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे क्रिकेट पंच परीक्षा घोण्यात येणार आहे. त्यासाठी जुन महिन्याच्या दुसर्या आठवड्यात पंच प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी दिली. पंच परीक्षा घेण्यापूर्वी परिक्षेस बरणार्यांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाईल. त्यात तज्ज्ञ मंडळी क्रिकेट नियामांबाबत मार्गदर्शन करतील. परीक्षत उत्तीर्ण होणार्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यांंना जिल्ह्यातील स्पर्धांमध्ये पंच म्हणून नियुक्त केले जाईल. शिबिराचे ठिकाण व तारीख लवकरच जाहीर केली जाईल. अधिक माहितीसाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी विवेक बहुतूले (9421158300) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मते यांनी केले आहे.