Breaking News

महाविकास आघाडीतील नेते गिरवतात भ्रष्टाचाराचे धडे -आमदार प्रशांत ठाकूर

रोहा देवकान्हे येथील असंख्य ग्रामस्थ भाजपमध्ये दाखल

रोहा, धाटाव : प्रतिनिधी

तालुक्यातील देवकान्हे येथील शेकडो ग्रामस्थांनी गुरुवारी (दि. 26) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. या वेळी महाविकासआघाडी सरकारचा खरपूस समाचार घेताना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सत्ताधारी नेते केवळ भ्रष्टाचाराचे धडे गिरवतात, असा घणाघात केला. यासोबतच केंद्र सरकारच्या सर्व योजना गावोगाव पोहचविण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.  रोहा तालुक्यातील देवकान्हे येथील कान्हेकर, शेंडगे, सुटे, ठाकूर, बामणे जंगम, पादिलकर, जाधव, मोहिते, कोंडे ग्रामस्थ, धाकेश्वर मित्र मंडळ व महिला मंडळातील पदाधिकारी आणि सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. देवकान्हे येथील पक्षप्रवेशाच्या वेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहीते, युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अमित घाग, रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांभेकर,  युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राजेश डाके, जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष निमिश  वाघमारे, तलवली सरपंच रघुनाथ कोस्तेकर, कामगार आघाडी अध्यक्ष विलास डाके, जिल्हा चिटणीस नरेश कोकरे, युवा मोर्चाचे सरचिटणीस दीपक भगत, धाटाव विभाग अध्यक्ष कृष्णा बामणे, भाजप नेते आनंद लाड, नागोठणे अध्यक्ष मोदी,  महिला जिल्हा उपाध्यक्ष श्रद्धा कुंटे, महिला चिटणीस श्रद्धा घाग, उपसरपंच वेदिका डाके, रोहा तालुका महिला अध्यक्ष जयश्री भांड, श्रेया कुंटे, संगिता फाटक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर या वेळी म्हणाले की, आपल्या संपूर्ण परिसराला निसर्ग उत्तम साथ देत आहे. तरीदेखील येथील शेतकर्‍यांची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक योजना राबविल्या जात आहेत, परंतु आमचे कर्मदरिद्री पणा असा आहे की, संबंधित खात्याचे मंत्री मलई ओरबडून खातात त्यामुळे सर्वसामान्य जनतेला पाणी देण्याऐवजी त्यांच्या डोळ्यात अश्रू वाट्याला येत, ज्यांच्यामुळे ही आज परिस्थिती ओढवली ते महाविकास आघाडी पक्षातील नेते गोरगरीब जनतेला विकासापासून वंचित ठेवाण्याचे काम करीत आहे, मात्र यासंदर्भात भाजप शांत बसणार नाही. तुमच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी भाजप नेहमीच कटिबद्ध राहील. महाविकास आघाडी सरकारचा प्रशांत ठाकूर यांनी खरपूस समाचार घेत सांगितले की, सत्ताधारी पक्षातील नेते केवळ भ्रष्टाचाराचे धडे गिरवताना दिसत आहेत. आधी भ्रष्टाचार करायचा आणि बोट मात्र केंद्राकडे दाखवायचे.  भाजपची बांधिलकी ही सर्वसामान्य जनतेच्या हिताची आहे. केंद्र शासनाने गोरगरीब जनतेस शेतकरी सन्मान, उज्वल गॅस,  घरकुल योजना, गावा गावात घरा घरामध्ये नळ पाणी योजना यांसारख्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. याचा लाभ मिळुन देण्यासाठी भाजप कायम कटिबद्ध राहील. दरम्यान, भाजप रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांभेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होत असल्याचे सांगितले. आज या पक्ष प्रवेशाने तालुक्याला कलाटणी मिळणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

समाजातील प्रत्येक स्तरातील घटकांना न्याय देण्याचे काम भाजप करत आहे. देशाचे अखंडता, सार्वभौमत्व व प्रगतीचा विचार करणारा भाजप पक्ष आहे. युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग यांनी निवडणुका नसतानाही देवकान्हे गावातील सुटे गावकी व ग्रामस्थांनी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवू.

-अ‍ॅड. महेश मोहिते, भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply