पनवेल : रामप्रहर वृत्त
महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. याच उद्देशाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत स्वस्थ नारी, सशक्त परिवार हे विशेष राष्ट्रीय अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे.
या अभियानांचा शुभारंभ बुधवारी (दि.17) महानगरपालिकेच्या लोकनेते दि.बा पाटील विद्यालयामध्ये आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त मंगेश चितळे, माजी महापौर कविता चौतमोल, माजी नगरसेविका, मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. याबरोबरच 2 ऑक्टोबरपर्यंत महापालिकेच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत होणर्या या आरोग्य शिबिरांचा महापालिका क्षेत्रातील महिलांनी व बालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.
या वेळी आयुक्त मंगेश चितळे, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौरचारुशीला घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, भाजपच्या जिल्हा चिटणीस विद्या तामखेडे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांच्यासह सर्व वैद्यकिय अधिकारी, पालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ इंदौर, मध्य प्रदेश येथून मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला, या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण तसेच मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर, रंगस्वर सभागृह नरिमन पॉईंट येथे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. याचेही थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आले.
या वेळी आयुक्त मंगेश चितळे यांनी 2 ऑक्टोबरपर्यंत महापालिकेच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत होणर्या या आरोग्य शिबिरांचा महापालिका क्षेत्रातील महिलांनी व बालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
या वेळी पालिकेच्या वतीने महिलांच्या विविध आरोग्य चाचण्याचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. तसेच या वेळी क्षयरोग रूग्णांच्या डिजीटल हॅण्ड होल्ड मशीनद्वारे छातीचे एक्सरे काढण्यात आले. या वेळी क्षय रुग्णांना पोषण आहाराचे किट देण्यात आले. तसेच निक्षय मित्रांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी 200 क्षयरूग्णांच्या पोषण आहाराची जबाबदारी घेतलेल्या दिपक फर्टीलायझरच्या प्रतिनिधींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या आरोग्य शिबिरासाठी डॉ. रेहाना मुजावर, माताबाल संगोपन अधिकारी डॉ.गणेश नायर, डॉ.मनिषा चांडक, डॉ.भक्तराज भुईटे, डॉ.सुरेश पंडित, क्षयरोग अधिकारी डॉ. उषा राठोड यांचे सहकार्य लाभले.
Check Also
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर
खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …
RamPrahar – The Panvel Daily Paper