Breaking News

पनवेलमधील विहीघर येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील विहीघर गावातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे एमएमआरडीएच्या माध्यमातून 60 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यानुसार या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 24) झाले.
पनवेल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून सातत्यापूर्ण पाठपुरावा सुरूच असतो. त्यानुसार विहीघर गावातील महादेव फडके यांच्या घरापासून ते मरीआई मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. हे काम एमएमआरडीएच्या 60 लाख रुपयांच्या निधीतून होणार असून निधी मंजूर करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठपुरावा केला होता.
भूमिपूजन समारंभास भाजपचे तालुका सचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, तालुका चिटणीस यतीन पाटील, माजी पं.स. सदस्य राज पाटील, युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील, बुथ अध्यक्ष अभय पाटील, सुरेश फडके, रोहित पाटील, हनुमान फुलोरे, रमेश पाटील, नितीन राऊत, मुकेश फडके, ज्ञानेश्वर फडके, बबन फडके, गजानन पाटील, शंकर फडके, मिन्नात पाटील, सागर पाटील, सोमनाथ पाटील, कृष्णा पाटील, सुरेश फडके, रमेश फडके, सुधीर फडके, सुरेश पाटील, साईनाथ पाटील, विष्णू पाटील, जनार्दन पाटील, अशोक फडके, अनंता पाटील, रवींद्र पाटील, नितीन पाटील, ओमकार फडके, जयदास पाटील, जयदास फडके, माजी सरपंच अनंता फडके, महादू फडके, रामदास पाटील, संकेत पाटील, संदेश फडके, जयनाथ पाटील, राकेश फडके, संतोष हरड, नरेश फडके, श्रीधर पाटील, वेद फडके, नितीन पाटील, दीपक पाटील, सोमानथ फडके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या वेळी गावातील महिलांनी समाजमंदिर आणि पाण्याच्या प्रश्न उपस्थित केला असता भाजप नेते अरुणशेठ भगत यांनी मे महिन्यात समाजमंदिराच्या भूमिपूजनाचा नारळ फुटेल, अशी ग्वाही दिली तसेच येत्या महिनाभरात जल जीवन मिशनचे काम सुरू होऊन पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असे आश्वासन दिले.

Check Also

भारतमाता चित्रपटगृहाशी माझं नातं अगदी वेगळं…

भारतमाता चित्रपटगृहाने छान कात टाकली. ते आजचं झाले.बदल हा होतच असतो, तो व्हायलाही हवा. काही …

Leave a Reply