मुंबई ः प्रतिनिधी
शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्याविरोधात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी ही तक्रार आहे. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी दीपाली सय्यद टीका करतात. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी मुंबई भाजप पदाधिकारी दिव्या ढोले यांनी केली. याबाबत भाजपतर्फे नवी मुंबई व खारघर भाजपतर्फे पोलीस ठाण्यात निवेदने देऊन कारवाई करण्याची मागणी रविवारी (दि. 29) करण्यात आली आहे.