पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका हद्दीत मॉन्सूनपूर्व कामे वेगाने सुरू आहेत. त्यापार्श्वभुमीवर कोयनावेळे आणि बावन बंगला परिसरात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 30) पाहणी करून आढावा घेतला. तसेच ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
या वेळी पनवेल महापलिकेचे स्थायी समिती सभापती अॅड. नरेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, हरेश केणी, संतोष भोईर, दिनेश केणी, पालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर, माजी सरपंच विनेश कदम, जयराम कदम, नरेश कदम, लोकनेते दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील आदी उपस्थित होते.