Breaking News

माथेरानमध्ये सुरू झालाय फुटबॉल फिव्हर

कर्जत : बातमीदार

माथेरानमधील मुलांना इतर खेळाप्रमाणे फुटबॉल खेळण्यात रुची निर्माण व्हावी, तसेच खेळतील गुणकौशल्य अधिक वृद्धिंगत व्हावे या हेतूने येथील प्रसादभाई मित्र परिवार, क्रीडालोजी व स्पोर्ट्स वर्क्स इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने येथील हुतात्मा भाई क्रीडा संकुल येथे फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते.

मागील वर्षी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी फुटबॉलला प्रमोट करण्यासाठी येथे फुटबॉल प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. या फुटबॉल स्पर्धेसाठी येथे येणार्‍या स्पर्धकांमुळे माथेरानचे पर्यटन वृद्धिंगत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार या स्पर्धा घेण्यासाठी माथेरानमधील प्रसादभाई सावंत मित्र परिवार याच्यातर्फे एक दिवसाची स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. या वेळी येथील नगरसेवक, नगरसेविका व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेला येथील नगरसेवक प्रसाद सावंत यांच्या उद्घाटनाने सुरुवात झाली. 16 वर्षाखालील खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये एकूण आठ संघांनी प्रवेश घेतला होता. माथेरानसारख्या पर्यटनस्थळावर असलेले विस्तीर्ण मैदान आणि त्यात माथेरानमधील उन्हाळ्यात थंड हवामान त्यामुळे मैदानाचा फायदा फुटबॉलसाठी उठविण्याचा निर्णय मुंबई एफसीने घेतला आहे. मुंबई एफसीचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सूचित केल्याप्रमाणे आजची स्पर्धा ही तयारी होती आणि सरत्या पावसाळ्यात माथेरानमध्ये मोठी फुटबॉल स्पर्धा घेण्यासाठी पहिली टेस्ट म्हणून पाहिले जात होते, मात्र माथेरानमधील एकदिवसीय फुटबॉल स्पर्धेला जिल्ह्यातील आठ संघांचा सहभाग लक्षात घेता माथेरानमध्ये फुटबॉल फिव्हर आलेले असेल, असा विश्वास माथेरानकर व्यक्त करीत आहेत.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply