नेरळने पटकावला कर्जत ब्राह्मण सभा चषक

कर्जत : बातमीदार

कर्जत ब्राह्मण सभा आयोजित क्रिकेट स्पर्धेत नेरळ ब्राह्मण सभा संघाने बाजी मारली. तरुण कार्यकर्त्यांना आणि समाजाला एकत्र करण्यासाठी ब्राह्मण सभेने पुढाकार घेऊन प्रथमच अशी स्पर्धा आयोजित केली.

कर्जत ब्राह्मण सभेच्या वतीने मार्केट यार्डच्या मैदानावर आयोजित केलेल्या या स्पर्धेत कर्जत मधील एकूण 126 तरुण खेळाडूंनी एकूण 7 संघांत भाग घेतला. या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन कर्जत तालुका सर्व शाखीय ब्राह्मण सभेचे उपाध्यक्ष महेश वैद्य, खजिनदार दीपक वैद्य, दीपक साने, मिलिंद साने यांच्या हस्ते झाले. कर्जत तालुका सर्व शाखीय ब्राह्मण सभेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत वैद्य फर्निचर, गांगल वारीयर्स, माई साने 11, एनएम 11, सगुणा बाग, ब्राह्मण सभा नेरळ, गुरुदत्त 11 या सात संघांनी भाग घेतला. चुरशीच्या व रंगलेल्या या सामन्यात ब्राह्मण सभा नेरळ या संघाने परशुराम चषक पटकावला, सगुणा बाग द्वितीय, गांगल वॉरियर्स तृतीय, तर एन एम 11 संघाने चौथे स्थान पटकावले.अनंतकाका जोशी प्रतिष्ठान, डॉ उपेंद्र सुगवेकर क्लिनिक यांनी या स्पर्धेसाठी आर्थिक हातभार लावला होता. इकोसन या संस्थेने सर्व स्पर्धकांना कॅप्स दिल्या होत्या. ब्राह्मण एकीकरण हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून आपण हे सामने घेतले होते ते उद्दिष्ट साध्य झाले, असे प्रतिपादन ब्राह्मण सभेच्या अध्यक्षा श्रीमती विजयाताई पेठे व सचिव श्रीमती जोगळेकर यांनी सर्व तरुणांचे कौतुक करताना केले.सार्थक घरलुटे, प्रथमेश कानडे, मंदार लेले, निनाद सोमण, देवेन कुलकर्णी, साजन निमकर, योगेश साठे, तुषार जोशी, विशाल जोशी, अभिजित मराठे, ऋषिकेश दातार, दिलीप गोगटे यांनी या स्पर्धांसाठी विशेष कष्ट घेतले. स्पर्धेसाठी वैभव वैद्य, विनायक बहुतुले, नंदन भडसावळे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

Check Also

Perish Arten bei Freispielen existieren in Moglich Casinos?

Neue Casinos via Freespins abzuglich Einzahlung Der ihr Hauptvorteile beim Zum besten geben in virtuellen …

Leave a Reply