खोपोली : प्रतिनिधी
ताकई रस्त्याच्या काँक्रटीकरणाचे कामाला वर्ष होवून गेल्यानंतरही काम अर्धवट असल्यामुळे रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यंमध्ये पावसाचे पाणी साठल्यावर वाहनचालकांची मोठी पंचायत होत अपघात घडतील या भितीने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थ पुन्हा पालिकेत जाब विचारण्यासाठी जाणार आहेत. ताकई रस्त्याच्या कामासाठी एमएमआरडीएने चार कोटी 80 लाख रूपयांचा निधी दिला आहे. वर्षापूर्वी दिमाखदार भूमिपूजन सोहळा केल्यानंतरही रस्त्याची अवस्था जैसे थे आहे. ठेकेदाराने हा रस्ता अनेक ठिकाणी खोदून ठेवल्याने पूर्वीपेक्षा आता रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. एक वर्ष झाले तरी 20 टक्के काम झाले होते आणि अनेक महिने काम बंद असल्यामुळे खड्ड्यांचे साम्राज्य वाढत रस्त्याची विकट अवस्थच झाली आहे. अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे दिवसेंदिवस अपघात घडत आहेत. या गंभीर समस्येविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
रस्त्याचे काम असल्यामुळे मुख्याधिकारी यांची सर्वपक्षीय नेत्यांनी भेट घेतली असता काम सुरू केल्यानंतर पूर्ण काम होईपर्यंत काम बंद करू नये, अन्यथा आमरण उपोषण आणि रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा दिला होता. त्यावेळी ठेकेदाराने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र जून महिना सुरू झाला तरी रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे पुन्हा मुख्याधिकारी यांची भेट घेवून शेवटचे आंदोलन छेडणार आहोत.
-किशोर पाटील, ग्रामस्थ