Breaking News

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर शाळेचा दहावीचा 100% निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाचा निकाल 100% लागला आहे.

विद्यालयातून 68 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील 34 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य मिळाले आहे. प्रथम श्रेणीत 33 विद्यार्थी व द्वितीय श्रेणीत एक विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक स्नेहा अनिल पाटील 91.40 टक्के, द्वितीय सानिका राजेश पिसाळ 90.60 टक्के, तर नम्रता बाळकृष्ण साळुंके 89.80 टक्के गुण मिळवत तिसरी आली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, शाळेच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply