लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे गव्हाण येथे प्रतिपादन
पनवेल : रामप्रहर वृत्त
सर्वांना सोबत घेऊन अनेक कामे मार्गी लागतात, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी (दि. 5) गव्हाण येथे कार्यालयाच्या उद्घाटनावेळी केले. शांतादेवी दिव्यांग सामाजिक विकास संस्थेचे कार्यालय गव्हाण येथे नव्याने बांधण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले.
पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीसमोर शांतादेवी दिव्यांग सामाजिक विकास संस्थेचे कार्यालय बांधण्यात आले आहे. या कार्यालयाच्या बांधकामासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात झाला. या सोहळ्याला कामगार नेते महेंद्र घरत, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरूणशेठ भगत, गव्हाण ग्रामपंचयतीचे उपसरपंच विजय घरत, सदस्या योगिता भगत, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, न्हावा ग्रामपंचायतीचे सदस्य सागर ठाकूर, कोळी समाज अध्यक्ष विश्वनाथ कोळी, रयत शिक्षण संस्थेचे लाइफ मेंबर प्रमोद कोळी, शांतादेवी दिव्यांग सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक हाडकु कोळी, अध्यक्ष अशोक कोळी, उपाध्यक्ष सचिन कोळी, सेक्रेटरी कांचन कोळी, खजिनदार जनार्दन कोळी, यांच्यासह यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.