Breaking News

वर्षीतप पारणोत्सवास निमित्ताने नागोठणेत शोभा यात्रा

नागोठणे : प्रतिनिधी : येथील जैन बंधुभगिनींनी केलेल्या साडेचौदा महिन्यांच्या उपवासाची सांगता मंगळवारी (दि. 7) अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होत असून, त्यानिमित्ताने सोमवारी (दि. 6) सकाळी नागोठणे शहरात उपवास करणार्‍या तपस्वींची 15 रथांतून शोभा यात्रा काढण्यात आली होती.

आचार्य अजित शेखरसुरीश्वरजी महाराज, देवकिर्ती विजयजी महाराज, कृपाशेखर विजयजी महाराज, अभय शेखरसुरीश्वरजी महाराज, चारित्रवर्धनाश्रीजी म. सा., ज्योतीवर्धनाश्रीजी म. सा. आदी साधू- साध्वीच्या प्रमुख उपस्थितीत चौदा महिन्यांचा उपवास करणार्‍या लीलाबाई केवलशा मुथा, चंपादेवी दोशी, संगीता दोशी, सारिका दोशी, ललिता दोशी, जितेंद्र दोशी, ममता दोशी,संगीता दोशी, विमलाबाई मंडलेशा,फेन्सीबाई पिताणी,उर्मिला पिताणी,विक्रम पिताणी,रेखा पिताणी,मनोज पिताणी, सुजाता पिताणी,भरत पिताणी, संतोषी पिताणी, जितेंद्र केवलशा मुथा, शीतल केवलशा मुथा, लीना केवलशा मुथा,सोनल केवलशा मुथा,सोनल केवलशा मुथा, गुणवंती केवलशा मुथा, संगीता केवलशा मुथा, भागचंद केवलशा मुथा, भावना केवलशा मुथा, पुष्पाबाई फुलफगर,सोनल फुलफगर, शांतीबाई फुलफगर,रेखा ओसवाल, कमलाबाई राठोड, वीणा पालरेशा, सरोज परमार, रीना परमार, विजया परमार, ललिता परमार, संगीता परमार, जयश्री पोरवाल, चंपाबाई शर्मा, ताराबाई कोठारी, मंगला सोलंकी, गीता परमार, जीवन परमार, किशोर नाहर आणि सुरेश घोका आदी तपस्वींची सोमवारी सकाळी 15 रथांतून शहरात शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत जि. प. सदस्य किशोर जैन, माजी जि. प. सदस्य नरेंद्र जैन, माजी सरपंच प्रकाश जैन, निहालचंद जैन, घिसुशेठ जैन, राजेन्द्र जैन आदी मान्यवरांसह नागोठणे तसेच पाली, रोहे, पेण, पोयनाड, अलिबाग, इंदापूर, मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, कल्याण, लोणावळा, खोपोली, कर्जत येथील हजारो जैन बांधव सहभागी झाले होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply