खारघर : रामप्रहर वृत्त
येथील प्रभाग ‘अ’मधील सिडकोकडून पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरीत झालेले नाले व गटारे साफसफाईची कामे अतिशय वेगाने आणि उत्तम रीतीने सुरू झाली आहेत.पावसाळा तोंडावर आले असताना सिडकोने गटारी व नाले साफसफाईची कामे पालिकेला हस्तांतरित केले. हे आव्हान पालिकेने स्वीकारून निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात सुद्धा केली. मागील वर्षापर्यंत नाले व गटारे साफ सफाईची कामे सिडकोच्या अखत्यारीत होती. गेली अनेक वर्षे कामे न झाल्याने अनेक घरासमोरील पावसाचे पाणी वाहून जाणारे गटारे नागरिकांनी बंद करून ठेवलेली होती. जेथे जेथे गटारावरील झाकणे आहेत तेथील माती उपसण्याचे काम चांगल्या पद्धतीने होत आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा उचलण्याची सेवा पालिकेला हस्तांतरण झाल्यापासून पनवेल महानगरपालिका क्षेत्र कचरामुक्त झाली. त्यानंतर नाले व गटारे साफसफाईचे कामसुद्धा उत्तमरीत्या चालू असल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. पांडवकड्याचे पावसाळ्यात वाहणार्या नाला साफ करण्याचे काम जवळपास पूर्ण झालेले आहे. आपापल्या वॉर्डमधील सर्व नगरसेवक प्रत्यक्ष उभे राहून कामावर लक्ष ठेवून आहेत. प्रभाग 5चे आरोग्य अधिकारी संदीप भोईर हे रोजच्या कामाचा आढावा अधिकार्यांना देऊन लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याच्या मागे लागले आहेत.