Breaking News

बामणडोंगरीतील पाणीपुरवठा सुरळीत करा

उपसरपंच अमर म्हात्रे यांची मागणी; जलकुंभाच्या विद्युत जोडणीसंदर्भात ग्रामपंचायतीला स्मरणपत्र

पनवेल : रामप्रहर वृत्त

बामणडोंगरी येथे सिडकोतर्फे बांधण्यात आलेल्या भूमिगत जलकुंभासाठी विद्युत जोडणी एमएसईबीकडून मंजूर करून घेण्यास वहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक टाळाटाळ करीत आहे, असा आरोप उपसरपंच अमर म्हात्रे यांनी केला आहे. यासोबतच येथील नागरिकांची पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडविण्याची मागणी त्यांनी केली आहे. उपसरपंच अमर म्हात्रे यांनी वहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्या नावे स्मरणपत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी म्हटलेय की, बामणडोंगरी येथे सिडकोतर्फे बांधण्यात आलेल्या भुमिगत जलकुंभासाठी विद्युत जोडणी एमएसईबीकडून मंजूर करण्यासंदर्भात 12 एप्रिल 2022 म्हणजे जवळपास दोन महिन्यांपूर्वी सिडकोचे उलवे 1 येथील कार्यकारी अभियंता एस. बी. ठाकूर यांच्याकडून लेखी पत्र देण्यात आले आहे. तरीदेखील ती जोडणी झालेली नाही. या जलकुंभाच्या टाकीत पाणी साठवण व गावात पाणी वितरण करण्यासाठी जे ईलेक्ट्रिक पंप लाईटवर चालणार आहेत, त्या पंपासाठी विद्युत जोडणी एमएसईबीला अर्ज देण्याची विनंती करण्यात आली होती. तसेच यापूर्वी सिडको व टाकीच्या ठेकेदारांना धारेवर धरून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी टाकीचे काम मी उपसरपंच म्हणून व ग्रामपंचायत सदस्य गीता ठाकूर, योगिता नाईक तसेच ग्रामस्थांनी वेळेवर पावसाळ्यापूर्वी करून घेतले, मात्र तुम्ही विद्युत जोडणी वेळेवर करून घेतली नाही. बामणडोंगरी गावात जर टाकीतून पाणीपुरवठा सुरू झाला, तर सर्व गावकर्‍यांना हे पाणी मिळणार आहे. त्यामुळे या आठवड्याभरात विद्युत जोडणी मंजूर करून घ्यावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, असे अमर म्हात्रे यांनी या स्मरणपत्रात नमूद केले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply