Breaking News

मास्कचा काळाबाजार करणार्यांना मोक्का लावा -आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी

वांद्रे येथे मास्कचा काळाबाजार करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी मास्कचा साठा करून काळाबाजार करणार्‍यांवर मोक्कांतर्गत कारवाई करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मास्कचा तुटवडा भासत आहे, मात्र अशा परिस्थितीत काही जणांकडून मास्कचा काळाबाजार करण्यात येत आहे. मुंबईतील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांसाठी आलेल्या मास्कचा साठा करणार्‍यांवर वांद्रे परिसरात मंगळवारी (दि. 24) कारवाई करण्यात आली. या कारवाईत जवळपास 15-20 कोटींचे 25 लाख मास्क जप्त करण्यात आले आहेत. मास्कचा साठा केल्यानंतर दोन रुपयांचा मास्क 10 रुपयांना आणि 100 रुपयांचा मास्क 400 रुपयांत विकण्याचा या रॅकेटचा डाव होता, मात्र गुन्हे अन्वेषण विभागाने वेळीच कारवाई करून हा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी वांद्रे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देसाई यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केलेल्या कारवाईबद्दल आमदार आशिष शेलार यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

Check Also

परेश ठाकूर यांची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

पनवेलसह रायगडच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची (एमबीए) ८४वी चतुर्वार्षिक …

Leave a Reply