Breaking News

सिडको घेराव आंदोलनासाठी गावोगावी बैठका

पनवेल : रामप्रहर वृत्त

लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात याव्या यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने दिबांच्या स्मृतिदिनी म्हणजेच 24 जूनला सिडको घेराव आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकांना प्रारंभ झाला असून न्हावे येथे गुरुवारी (दि. 8) भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्वपक्षीय कृती समितीचे सहचिटणीस राजेश गायकर यांनी मार्गदर्शन करून सिडको घेराव आंदोलन यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. या वेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, जयवंत देशमुख, किशोर पाटील, सुधीर ठाकूर, सागरशेठ ठाकूर, अरुणशेठ ठाकूर, सी. एल. ठाकूर, सदाशिव ठाकूर, तुकाराम मोकल, अनंता ठाकूर, रामदास ठाकूर आदी उपस्थित होते. दरम्यान, मागील काही दिवसांमध्ये खारघर येथील ओवेपेठ, टेंभोडे, वळवली, कळंबोली, चिंचपाडा, वडघर, करंजाडे, कोपर या ठिकाणीही जनजागृतीपर बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत व कृती समितीचे सहचिटणीस राजेश गायकर यांच्यासह नगरसेवक बबन मुकादम, संदीप भगत, समीर केणी आदी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply