Breaking News

उद्या भाजपचा उत्तर रायगड जिल्हा संपर्क दौरा

कळंबोली : रामप्रहर वृत्त

भाजपा उत्तर रायगड जिल्हा संपर्क दौरा शनिवारी (दि. 11) भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. सहसंयोजक गोविंदा गुंजाळकर यांच्यासह महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष उज्वला हाके, प्रदेश सहसंयोजिका सुहासिनी केकाणे, कोकण संयोजक श्रीराम इदाते, कोकण महिला आघाडी संयोजिका डॉ. समीर भारती, कोकण सहसंयोजक भास्कर यमगर, कोकण सहसंयोजिका उज्वला गलांडे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, उत्तर रायगड जिल्हा प्रभारी चंद्रकांत मंजुळे, उत्तर रायगड महिला आघाडी संयोजिका विद्या तामखडे, उत्तर रायगड जिल्हा सहसंयोजिका निता मंजुळे इतर पदाधिकारी यांच्यासोबत दौरा आयोजित केलेला आहे. भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे व हा दौरा यशस्वी करावा, असे आवाहन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. दौर्याचा कार्यक्रम हा कळंबोली मॅकडोनाल्ड हॉटेल येथून सकाळी 8 वाजता सुरू होईल. 8.30 वाजता नेरळकडे प्रस्थान करणे. नेरळ ठिकाणी सकाळी 10 वाजता धनगर वाडा येथे तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधणे. (रामा शेंडगे संपर्क- 9226242261), 10.30 वाजता नेरळ कर्जतकडे प्रस्थान करणे. 11 वाजता वेणगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम व कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करणे. (मंगेश साळुंखे 7887797944) 12  वाजता वेणगाव वरून कर्जत येथे जेवणासाठी थांबणे. दुपारी 1 वाजता खोपोलीकडे प्रयाण करणे, दुपारी 2 वाजता खोपोली येथील कार्यालयात पदाधिकार्‍यांशी संवाद व नियुक्तीपत्र प्रदान करणे. (संतोष लोहार-9158721338), दुपारी 2.30 वाजता ठाकुरवाडी येथे मिठाई वाटप करणे. 3 वाजता पनवेलकडे प्रयाण. दुपारी 4 वाजता पनवेल येथे कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधणे. (गोपीनाथ तु. मुंडे -9323547922), 4.30 वाजता लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवास्थानी भेट व महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्यासह पनवेल शहर व ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सोबत संवाद साधणे. 5.30 वाजता कामोठेकडे प्रयाण संध्याकाळी 6.00 वाजता कामोठे येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधणे. (विद्याताई तामखडे) 6.30 वाजता खारघरकडे प्रयाण करणे. (दिलीप आडे – 9529463974) संध्याकाळी 7 वाजता खारघर येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्याची संवाद व नियुक्तीपत्र प्रदान करणे. 7.30 वाजता कळंबोलीकडे प्रयाण. संध्याकाळी 8 वाजता कळंबोली येथील भाजप कार्यालयात सदिच्छा भेट (आबा घुटुकडे-7039192625), संध्याकाळी 8.30 वाजता भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांच्या घरी सांत्वनपर भेट होईल व दौर्‍याची सांगता होईल.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply