Breaking News

विरोधकाला तिसर्यांदा पाणी पाजणार

आमदार भरत गोगावले यांचे निजामपूर गाव बैठकीत प्रतिपादन

माणगाव : प्रतिनिधी

महाड विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीत बॅलेट मशीनवर आपले नाव एक नंबरवर आहे, तर प्रतिस्पर्धी काँगे्रस उमेदवाराचे नाव तीन नंबरवर आहे, त्यामुळे आपण त्यांना आता तिसर्‍यांदा पाणी पाजण्यासाठी सज्ज झालो आहोत, असे महायुतीचे उमेदवार आमदार भरत गोगावले यांनी निजामपूर विभागातील नारायणगाव वांगणेवाडी या ठिकाणी गाव बैठकीत बोलताना सांगितले. महायुतीचे उमेदवार आमदार गोगावले यांनी शुक्रवार (दि. 11) माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागात धावता दौरा करून कार्यकर्ते व मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. वांगणेवाडी येथील गावबैठकीत बोलताना आमदार गोगावले म्हणाले की, निजामपूर विभागात गेल्या 10 वर्षामध्ये आपण रस्ते, गावातील अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना, सभागृह, सभामंडप, शाळागृह, नवीन शाळांच्या इमारती अशी विविध विकासकामे केली आहेत. लोकांच्या सुख-दुःखात धावून जात असतो, म्हणून या मतदारसंघातील लोकांनी मला दोन वेळा निवडून दिले असून तिसर्‍यांदा आपण निवडून येणार आहोत. आपल्या धावत्या दौर्‍यात आमदार गोगावले यांनी निजामपूर भागातील रवाळजे, पाटणूस, निजामपूर, बोंडशेत, तासगाव, भागाड आदी अनेक गावांना भेटी देऊन कार्यकर्ते व मतदारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांच्यासमवेत विभागप्रमुख प्रसाद गुरव, सुधीर पवार, उपतालुका प्रमुख नितिन पवार, कासार गुरुजी, मिलिंद फोंडके, गणेश समेळ यांच्यासह शिवसैनिक व भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply