रेवदंडा : प्रतिनिधी
मान्सूनपूर्व शेतीच्या कामाची लगबग सुरू असून रेवदंडा परिसरात शेताची मशागत, उखळणी तसेच धान्य पेरणीच्या कामांनी वेग घेतला आहे.
मे महिना सरताच जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाची सुरूवात होते. त्यामुळे रेवदंडा परिसरातील शेतकर्यांच्या मान्सुनपुर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी शेतात नांगरणी, उखळणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. सोबत धान्य पेरणीसुध्दा सुरू आहे. सुरूवातीच्या पावसाच्या रिपरिपीने शेतकरी सुखावले आहे. बहुतांश मान्सुनपुर्व शेतीची कामे आटोक्यात आली असून शेतकर्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.