Breaking News

माथेरान नागरी पतसंस्थेची निवडणूक जाहीर

कर्जत : बातमीदार

ब्रिटिश काळात भाऊसाहेब राऊत आणि भाई कोतवाल यांनी स्थापन केलेल्या माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, संस्थेच्या 13 संचालकांची निवड करण्यासाठी 11 जुलै रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांच्या आदेशाने कर्जत तालुका सहकारी संस्था सहाय्यक निबंधकांनी माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शाम कपोते यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची घोषणा कर्जत तालुका सहाय्यक निबंधक काटकधोंड यांनी केली आहे.

माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेत संचालक पदाच्या 13 जागा असून त्यापैकी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आठ तर महिलांसाठी दोन जागा राखीव आहेत. तसेच अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय आणि भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा राखीव आहे. माथेरान नागरी पतसंस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार  नामनिर्देशन पत्र सादर करण्याची मुदत 15 जून रोजी दुपारी तीनपर्यंत आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी 16 जून रोजी करण्यात येणार असून वैध अर्जाची यादी 17 जून रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. 5 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. आवश्यकतेनुसार 11 जुलै रोजी माथेरानमधील कम्युनिटी सेंटरमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. तर मतमोजणी त्याचदिवशी घेण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शाम कपोते यांनी दिली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply