Breaking News

कर्जतचे कुणाल साळवी यांच्या चित्रांचे मुंबईत प्रदर्शन

कर्जत : बातमीदार

येथील चित्रकार कुणाल साळवी यांच्या निसर्ग चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले असून, त्याला मुंबईकरांसह अनेक परदेशातील पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. जहांगीर आर्ट गॅलरीमधून कुणाल साळवे यांची चित्रे अनेकांनी खरेदी केली असून आतापर्यंत सुमारे पाच लाख रुपये या चित्रप्रदर्शनातून विकली गेली आहेत.

कोकणातील सुंदर समुद्रकिनारे, हिरवीगार वनराई, पक्ष्यांचा किलबिलाट, मच्छिमार आणि त्यांच्या विविधरंगी बोटी, वेगवेगळी माणसे आणि त्यांच्या वेशभूषा, समुद्राच्या पोटात गुडूप होणार सूर्यास्त आणि त्यानंतरची भरलेली संध्याकाळ अशा अनेक विषयांवर कुणाल साळवी यांनी चित्रे साकारली आहेत. या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये 6जूनपासून सुरू असून त्याला जाणकारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply