Breaking News

केरळात कोरोनाचे पाच नवे रुग्ण; संख्या पोहचली 39वर

तिरुअनंतपुरम (केरळ) : वृत्तसंस्था

 भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रविवारी (दि. 8) केरळ राज्यात पाच नवे रुग्ण

आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी ही माहिती दिली. याबरोबर भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 39वर पोहचली आहे. या पाचही रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली असून हे पाच जण इटलीहून परतले होते. या परतलेल्या लोकांमुळे पठ्ठणमतिठ्ठा जिल्ह्यातील दोघांना या विषाणूची लागण झाली.

दरम्यान, शनिवारी कोरोनाची लागण झालेले तीन नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर कोरोनाग्रस्तांची संख्या 34 झाली होती. ओमानहून परतलेल्या तामिळनाडूतील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. याव्यतिरिक्त इराणहून परतलेल्या लडाखच्या दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. अशा प्रकारे 24 तासांच्या कालावधीत कोरोनाचे आठ नवे रुग्ण आढळले होते. केरळातील नव्या रुग्णांबाबत मिळालेल्या माहितीनुसार सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या रुग्णांत दोन पुरुष, एक महिला व नातेवाइकांचा समावेश आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply