Breaking News

सिडको घेराव आंदोलन बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त

लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात याव्या यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने ‘दिबां’च्या स्मृतिदिनी म्हणजेच 24 जूनला सिडको घेराव आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या होणार्‍या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. धाकटा खांदा, मोठा खांदा गाव, गव्हाण-कोपर, शेलघर, बेलपाडा येथे बैठका झाल्या.

या बैठकांमध्ये सर्वपक्षीय कृती समितीचे सहचिटणीस राजेश गायकर यांनी मार्गदर्शन करून सिडको घेराव आंदोलन यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. या वेळी गव्हाणचे उपसरपंच विजय घरत, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, जयवंत देशमुख, ग्रामपंचायत सदस्य कामिनी कोळी, उषा देशमुख, सुजाता पाटील, हेमंत ठाकूर, अनंत ठाकूर, सुधीर ठाकूर कमलाकर देशमुख, रघुनाथ देशमुख, दामोदर भोईर, भाऊ भोईर, पी. के. ठाकूर, अमित कडू, मधुकर म्हात्रे, राजेंद्र देशमुख, दयानंद घरत, मधुकर पाटील, आशिष घरत, राजेश पाटील, ज्येष्ठ नगरसेवक माजी सभापती मनोहर म्हात्रे, महेंद्र कावळे, सतीश पाटील, भाजप युवा नेते निलेश खारकर, अरुण नाईक, मदन पाटील, वितेश म्हात्रे, मच्छींद्र कोळी, प्रवीण ठाकूर, अश्विन नाईक, नंदू ठाकूर यांच्यासगावातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply