Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून विद्यार्थ्यांचे स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त
शैक्षणिक वर्ष 2022-23ला बुधवार (दि. 15)पासून सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल  सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत केले.
वैश्विक महामारी कोरोनाच्या कठीण काळानंतर बुधवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्या. या वेळी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन ठिकठिकाणी केले गेले होते. त्यानुसार रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलमध्येही अशा प्रकारच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे विद्यालयात स्वागत केले.
या कार्यक्रमास पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, नगरसेविका कुसुम म्हात्रे, रयत शिक्षण संस्थेचे निरीक्षक रोहिदास ठाकूर, जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब कारंडे, मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, अर्चना चव्हाण-खाडे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply