Breaking News

पावसाळ्यात नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी; डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

अलिबाग : रामप्रहर वृत्त

जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून, पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने वैयक्तीक स्वच्छतेसह आपल्या परिसरातही स्वच्छता राहिल याची काळजी घ्यावी, पाणी उकळून प्यावे, साथीच्या आजाराची लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी केले आहे. पावसाळ्यात पिण्याचे पाणी काही कारणाने दुषित झाल्यास कॉलरा, विषमज्वर, गॅस्ट्रो अशा आजारांचा प्रादुर्भाव होतो. तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थांवर माश्या बसून ते दुषित झाल्यास उलट्या, जुलाब, कावीळ असे आजार होतात. याबाबत काही लक्षणे आढळल्यास त्वरीत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा इतर शासकीय रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार घ्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाळ्यात उद्भविणारे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, शुद्धीकरण न केलेले बोअरवेल किंवा विहिरीचे पाणी तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे, पाणी स्त्रोतांचा परिसर स्वच्छ ठेवावा यासह इतर सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने केल्या आहेत.

काय करावे : पिण्याचे पाणी उकळून थंड झाल्यावर शक्य असल्यास त्यात क्लोरिनचा वापर करून पिण्यास वापरावे. अन्न पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत. उलट्या, जुलाब, कावीळ, गॅस्ट्रो, विषमज्वर झाल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत. प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करावे. नागरिकांनी आपल्या घरातील व सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा.

काय करू नये : शुद्धीकरण न केलेल्या बोअरवेल, विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरू नये. शिळे किंवा उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नये. उघड्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ खाऊ नये. ताप, मळमळ, चक्कर, उलटी, आदी गॅस्ट्रोची लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. त्वरीत डॉक्टरांकडे जावे.

Check Also

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …

Leave a Reply