कर्जत : बातमीदार
माथेरान येथील माथेरान नागरी पतसंस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. भाजपच्या वतीने माथेरान पतसंस्थेवर भाजपचे कमळ फुलविण्यासाठी जोरदार तयारी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, माथेरान शाखा पतसंस्थेची सार्वत्रिक निवडणूक भाजप ग्रामदैवत पिसारनाथ पॅनल म्हणून लढविणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून सर्व जागांसाठी उमेदवार देण्यात आले आहेत. 1937मध्ये स्थापन झालेल्या माथेरान नागरी पतसंस्था सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष माथेरान शहर शाखा यांच्या श्री पिसारनाथ पॅनलकडून सर्व 13 जागांसाठी 13 उमेदवार यांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. यात सर्वसाधारण जागेसाठीचे उमेदवार अरविंद बाबाजी शेलार, प्रदीप दत्ताराम घावरे, दीपक जयंतीलाल शहा, भद्रेश इंद्रावधान शहा, विलास विनायकराव पाटील, रामचंद्र नारायण ढेबे, दिनेश लक्ष्मण आखाडे, बाबुराव विठ्ठल बर्गे, मनोहर राघो रांजाने तर महिला राखीवसाठी प्रतिभा प्रदीप घावरे, संध्या अरविंद शेलार यांचे तर इतर मागास प्रवर्ग राकेश नरेंद्र चौधरी आणि विशेष मागास प्रवर्गासाठी संतोष गंगाराम आखाडे याचबरोबर अनुसूचित जाती जमातीसाठी उषा परशुराम पांगसे आणि संदीप नारायण कदम यांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. भाजपच्या पिसारनाथ पॅनल चे उमेदवार यांचे नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी भाजप कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, भाजप कर्जत तालुका उपाध्यक्ष विलास पाटील, माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, भाजप शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ, शहर कार्याध्यक्ष किरण चौधरी, यांच्यासह कर्जतचे युवा कार्यकर्ते किरण ठाकरे, प्रकाश पेमारे, अनिल जैन, शहरचिटणीस राजेश चौधरी, माजी नगरसेविका प्रियंका कदम, रुपाली आखाडे, लक्ष्मी चौधरी, चंद्रकांत जाधव, कर्जत तालुका भटक्या विमुक्त जमात संयोजक तुकाराम आखाडे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, या निवडणुकीसाठभ भाजपची जोरदार तयारी सुरु झाली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper