नवी मुंबई :
तुर्भे नाका येथून चुन्ना भट्टी – बोनसरी गाव येथे जाण्यासाठी फुलचंद चौधरी नावाचा प्रवाशी रिक्षा चालक रमेश मोरे यांच्या रिक्षामध्ये बसला व प्रवासा दरम्यान ठरल्याप्रमाणे आपले भाडे देऊन रिक्षामधून उतरून निघून गेला. परंतु सदरच्या प्रवासा दरम्यान त्याचा विवो कंपनीचा 16 हजार 500 किमतीचा मोबाईल रिक्षामध्ये विसरला होता. रिक्षा चालक देखील आपले भाडे घेऊन त्या ठिकाणाहून निघून गेला होता काही वेळा नंतर रिक्षा चालक आपली रिक्षाची साफसफाई करत असताना त्याला पाठीमाघील सिटवर विवो कंपनीचा मोबाईल आढळून आला रिक्षा चालक रमेश मोरे यांनी कुठला ही मोह न बाळगता ही बाब सामाजिक कार्यकर्ते दिपक गायकवाड यांना कळवली व त्या प्रवाशाचा मोबाईल परत करण्याचा निर्णय घेतला व त्या मोबाईल वर फोन येण्याची वाट पहिली असता अर्धा तासा दरम्यान फोन आल्यानंतर प्रवाशाने सांगितलेल्या ठिकाणावर कुठला ही मोबदला न घेता रिक्षा चालक रमेश मोरे व सामाजिक कार्यकर्ते दिपक गायकवाड यांनी जाऊन फुलचंद चौहान या प्रवशाला मोबाईल परत केला. या वेळी आपला मोबाईल परत मिळाल्या बद्धल प्रवाशाने व स्थानिक नागरिकांनी रिक्षा चालक रमेश मोरे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.