Breaking News

नेरळ विद्या विकासचा निकाल 100 टक्के; जयेश चौधरी प्रथम

कर्जत : बातमीदार

विद्या विकास मंडळाच्या नेरळ गावातील विद्या विकास मंदिर या शाळेचा दहावीच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. जयेश नवल चौधरी याने दहावीच्या परीक्षेत 93.80 टक्के गुण मिळवून नेरळ विद्या विकास शाळेत पहिला क्रमांक पटकावला आहे.

हर्षवर्धन संतोष मगर (93 टक्के)  दूसरा तर किर्तिशा राजेंद्र म्हात्रे (92 टक्के) शाळेत तिसरी आली. विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष बल्लाळ जोशी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या वेळी संस्थेचे सचिव दिलीप कवाडकर, अमित जोगळेकर, मुख्याध्यापिका शैलजा निकम, शिक्षिका सहस्त्रबुद्धे, काळे, हर्षवर्धन मगर यांच्यासह पालक आणि शिक्षक उपस्थित होते.

अलिबागच्या केळकर विद्यालयाचा सलग दहाव्या वर्षी शंभर टक्के निकाल

अलिबाग : प्रतिनिधी

दहावीच्या परीक्षेत अलिबाग येथील  चिंतामणराव केळकर विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला.  शाळेतील एकूण 129 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सलग दहाव्या वर्षी शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

इंग्रजी माध्यमात श्रेया सुशील कडीकर पहिली आली. तिने 96.40 टक्के गुण मिळवून  शाळेत सर्व  विद्यार्थांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला. सेमी इंग्रजी माध्यमात इशा राजकुमार मलशेट्टी 93.60 टक्के गुण मिळवून प्रथम आली. मराठी माध्यमात  पारस अभय गंद्रे पहिला आला, त्याने 85 टक्के गुण मिळवले.

या शाळेच्या नऊ विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले. 38 विद्यार्थ्यांना 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले. 44 विद्यार्थ्यांना  70 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले. 24 विद्यार्थ्यांना 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले.

खांडपे येथील ज्ञान मकरंद विद्यालयात श्वेता कुंभार प्रथम

कर्जत : प्रतिनिधी

तालुक्यातील खांडपे येथील ज्ञान मकरंद विद्यालयाचा दहावीचा निकाल 96.36 टक्के लागला असून श्वेता संतोष कुंभार हिने 77.60 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

अपेक्षा महेंद्र पाटील हिने 77. 40 टक्के गुण मिळवून द्वितीय तर पौर्णिमा रामदास पाशीलकर हिने 77.20 टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळविला आहे. या विद्यालयात पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनी बाजी मारल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

रोहा तालुक्यात दहावीचा निकाल समाधानकारक

रोहे : प्रतिनिधी

तालुक्याचा दहावीचा निकाल समाधानकारक लागला आहे. एम.बी.पाटील इंग्लिश स्कुलचा निकाल 100 टक्के लागला आहे. या विद्यालयात तृप्ती तपस दत्त (91.20 टक्के) पहिली, स्वरा महेश म्हात्रे (91 टक्के) दूसरी, प्रियाकुमारी उदय सिंग (89.60 टक्के) तिसरी आली. चेअरमन मधुकर पाटील, मुख्याध्यापिका पुनम देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

रोहा तालुक्यातील खांब येथील श्री. रा. ग. पोटफोडे (मास्तर) विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला असून या विद्यालयात प्रज्वल अशोक झोलगे (88.60टक्के) प्रथम, नम्रता नंदकुमार कापसे (87.80टक्के) दूसरी आणि संचिता हरिश्चंद्र मोरे (87.40टक्के) तिसरी आली.

तालुक्यातील श्रमिक विद्यालय चिल्हेचा निकाल 100 टक्के लागला असून या विद्यालयात मृदुला मधूकर साळवी (89 टक्के) पहिली, पल्लवी संजय कान्हेकर (86.60 टक्के) दूसरी आणि साक्षी सोनू भोईर (84.60 टक्के) तिसरी आली आहे.

न्यू इंग्लिश स्कूल विठ्ठलवाडी राजखलाटी या विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. या विद्यालयात शिवानी गजानन शिंदे (87.40 टक्के) प्रथम, भावेश महेश बैकर (83 टक्के) दूसरा आणि दिव्या भालचंद्र चव्हाण (79.20 टक्के) तिसरा क्रमांक मिळविला आहे.

सानेगाव येथील सानेगुरुजी विद्या निकेतनचा निकाल 97.43 टक्के लागला. या विद्यालयात  मानसी गोपाळ कडू (83.40 टक्के) पहिली, प्रेरणा जगदीश घाणेकर (83.20 टक्के) दूसरी आणि मृदुला मंगेश बांगारे (82.40 टक्के) तिसरी आली.

नागोठण्याच्या एन.ई.एस. उर्दू हायस्कूलचा  निकाल 97.50 टक्के निकाल लागला आहे. निहारा निसार पोत्रीक (85.60 टक्के), आयशा अर्शद अहमद अधिकारी (83.40 टक्के), सादीका मुनाफ शेख (81 टक्के) यांनी या विद्यालयात अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले आहेत.

कोएसो मेहेंदळे हायस्कुलचे 228 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. या विद्यालयाचा निकाल 98.68 टक्के लागला आहे. 60 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले. 113 विद्यार्थी पहिल्या श्रेणीत, 47 विद्यार्थी दूसर्‍या श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

माथेरानच्या गव्हाणकर विद्यालयाचा निकाल 100 टक्के

माथेरान : प्रतिनिधी

येथील शांताराम यशवंत गव्हाणकर या विद्यालयाचे एकूण 34 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले असून, या विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये  उत्साहाचे वातावरण आहे.

शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यालयात प्राची शैलेश बापर्डेकर हिने प्रथम, अनामिका नागेश कदम हिने द्वितीय आणि समिधा संदेश पाटील हिने तिसरा क्रमांक मिळविला आहे.

मुख्याध्यापक लक्ष्मण ढेबे, मुख्याध्यापिका कल्पना पाटील, शिक्षक दिलीप आहिरे, सचिन भोईर, अनिश पाटील, संतोष चाटसे, शिल्पा बहुरे, रमेश ढोले,  संघपाल वाठोरे, दिनेश बागवे, विदुला गोसावी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

माणगावच्या निकम इंग्लिश स्कुलमध्ये हुमेरा मुबिन अहमद झेटम सर्वप्रथम

माणगाव : प्रतिनिधी

येथील एस. एस. निकम इंग्लिश स्कुल या शाळेचा दहावीच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला असून  हुमेरा मुबिन अहमद झेटम हिने 97 टक्के गुण संपादन करून स्कूलमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे. अनुष्का विनोद देशमुख हिचा (93.60 टक्के) दूसरा तर अक्षत निलेश चव्हाण (92.60 टक्के) याचा तिसरा क्रमांक आला.

निकम इंग्लिश स्कुलचे 132 विद्यार्थी दहावी परीक्षेला  बसले होते. हे सव चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी सात विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. माणगाव एज्युकेशन ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, एस. एस. निकम इंग्लिश स्कुलच्या प्राचार्या, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी  यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply