Breaking News

मंदाताई म्हात्रे यांना नाभिक समाजाचा पाठिंबा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या विद्यमान आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांना नवी मुंबईतील नाभिक समाजाचा पाठींबा असून नाभिक समाजाने पाठींबा दर्शविण्यासाठी आपल्या शिष्टमंडळासह आमदार  मंदाताई म्हात्रे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी नाभिक विकास फाउंडेशन चे अध्यक्ष. नरेश गायकर, जयेश पवार, सुभाष गायकर, जगन्नाथ भोईर, समीर पवार, जयवंत गायकर, राजेश गायकर, विष्णू गायकर, लक्ष्मण गायकर, संगम पवार, जीवन गायकर, अजित गायकर उपस्थित होते.

बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार  मंदाताई म्हात्रे यांनी आपली 5  वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण केली असून या 5  वर्षाच्या काळात त्यांनी आमच्या समाजाने सांगितलेल्या सर्व समस्यांचे काम केले असून आम्ही केलेल्या सर्व मागण्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. त्यांनी आमच्या समाजातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग यांजबरोबर हितसंबंध जपत काम केले असून सर्वांना सोबत घेऊन काम करणार्‍या या पहिल्या आमदार पाहिल्या असल्याचे मत नाभिक विकास फाउंडेशनचे अध्यक्ष  नरेश गायकर यांनी सांगितले. नवी मुंबईतील समस्त नाभिक समाज यापूर्वीही आपल्या मागे उभा होता, आजही आहे आणि भविष्यात येणार्‍या कोणत्याही चांगल्या-वाईट प्रसंगात खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगत येणार्‍या 24  तारखेला होणार्‍या विजयी जल्लोषाची आम्ही तयारी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यमान आमदार  मंदाताई म्हात्रे या निवडून येणार यात शंकाच नाही, परंतु त्या भरघोस मतांनी निवडून यावे याकरिता महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नाभिक महासंघ व नाभिक विकास फाउंडेशन पाठींबा दर्शवित असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार मंदाताई म्हात्रे या दिलदार व्यक्तिमत्व असून त्यांची काम करण्याची पद्धत आपल्या सर्वांना माहित आहे. त्यांनी हाती घेतलेली कामे पूर्ण केल्याशिवाय त्या स्वस्थ बसत नसल्याचे सांगत यापुढेही त्याच आमदार म्हणून आम्हाला हव्या असल्याचा निर्धार आम्ही केला असल्याचे फाउंडेशनचे पदाधिकारी  जयेश पवार यांनी सांगितले.

Check Also

आमदार महेश बालदी 29 ऑक्टोबर रोजी दाखल करणार अर्ज

उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्रपक्ष युतीचे …

Leave a Reply